पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ गणपती बाप्पाला आज १३० लिटर आईस्क्रीमचा प्रसाद अर्पण करण्यात आला. पुण्यातील आईस्क्रीम बनवणाऱ्या ऐका व्यापाऱ्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाला मोतीचुर बुंदीच्या 130 लिटरचा आईस्क्रीम प्रसाद अर्पण केला.
शहरातील किगा आईस्क्रीम बनवणाऱ्या किरण साळुंखे आणि गणेश गोसावी यांनी मंडळाच्या 130 व्या वर्षानिमित्त 130 लिटर वजनाचा मोतीचुर लाडू मिश्रित आईस्क्रीमचा प्रसाद गणपतीच्या चरणी अर्पण केला.